सातकरवाडीत ९० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

Image may contain: 6 people, people standing
तळेगाव ढमढेरे, ता.४ जुलै २०१८(प्रतिनीधी) : सातकरवाडी येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात ९० रुग्णांची नेत्र तपासणी करून उपचार करण्यात आली.

सातकरवाडी (ता.शिरूर) येथील अभियंता अशोक सातकर यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते.या शिबिरात परिसरातील ९०  रुग्णांची तपासणी करण्यात आली. अहमदनगर येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ.प्रफुल्ल चौधरी यांनी नेत्र रोगाविषयी मार्गदर्शन करुन रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली. यामध्ये रुग्णांना चष्मा वाटप व मोतिबिन्दू शस्त्रक्रिया देखील सातकर  यांच्या वतीने करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे सदस्य विजय रणसिंग यांचे नेत्र तपासणीने शिबीराला सुरुवात झाली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्कप्रमुख राजाभाऊ मोरे, शिरूर बाजार समितीचे संचालक विकास शिवले, शिरूर तालुका मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष बाबूराव पाचंगे, दहीवडीचे उपसरपंच वाल्मिक सातकर, माजी सरपंच चिंतामण टेमगिरे, पोपट पाचंगे, नारायण सातकर, संदिप कुटे, संतोष सातकर आदी मान्यवर  उपस्थित होते. डॉ.किशोर सातकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या