शिरुरच्या नव्या सीईओंनी बदललीय कामाची पद्धत

शिरुर,ता.४ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर नगरपरिषदेत नव्याने रुजु झालेल्या नव्या मुख्याधिका-यांनी नगरपालिकेत वेगळाच पायंडा  पाडल्याने सर्वसामान्य नागरिकांना सुखद धक्का बसत आहे.

शिरुर नगरपालिकेत यापुर्वी नागरिकांना कामासाठी जाताना वेगवेगळे अनुभव येत होते.काही दिवसांपुर्वी मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांची बदली झाली असुन त्यांच्या जागी नव्याने अॅलिस पोरे या काम पाहत आहेत.अॅलिस पोरे यांनी कामाची सुञे हातात घेतल्यानंतर सर्वप्रथम स्वत:च्या केबिनपासुन बदलाची सुरुवात केली असुन केबिल मधील पडदे हटवलेले आहेत.त्याचप्रमाणे बसायची जागाही बदललेली असल्याचे दिसते.नागरिकांना आल्यानंतर थेट भेट व्हावी या उद्देशाने त्यांनी हा बदल केला असुन वारंवार ताटकळत उभे राहावे लागु नये म्हणुन नागरिकांसाठी सोफ्याची व्यवस्था केलेली आहे.प्रवेशद्वाराजवळ नोंदवही ठेवली असुन आतमध्ये येणा-या व जाणा-या प्रत्येकाची नोंद प्रवेशद्वारातच करणे बंधनकारक केले आहे.

सर्व विभगाच्या टेबलावर या पुर्वी कागदांचे गठ्ठे ठेवलेले होते.यामुळे कोणाचेच साधे डोके दिसत नव्हते.परंतु हे कागदी गठ्ठे हटविले सर्व टेबल स्वच्छ झाल्याचे पाहायला मिळत असुन असुन सीओंच्या दालनात बसुनही प्रत्येक विभागात काय चाललयं हे पाहणं या मुळे शक्य झालं आहे.शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अॅलिस पोरे यांनी या केलेल्या बदलाचे स्वागत शिरुरकरांनी केले असुन नागरिकांना नव्या सीओंच्या कामाच्या पद्धतीमुळे एकप्रकारे सुखद धक्काच बसत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या