ग्रामीण भागात बालसाहित्यिक तयार व्हावेत

तळेगाव ढमढेरे,ता.६ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शालेय विद्यार्थ्यांना साहित्याची आवड निर्माण व्हावी तसेच ग्रामीण भागात कवी व लेखक तयार व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून  महाराष्ट्र साहीत्य परिषद वाटचाल करणार असल्याचे मत महाराष्ट्र साहीत्य  परिषदेचे शिरूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष मनोहर परदेशी यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे(ता.शिरूर) येथील शिक्षक भवनमध्ये गुरुवार (दि.५ जुलै) रोजी आयोजित महाराष्ट्र साहीत्य  परिषद शिरूर ग्रामीणच्या बैठकीत चर्चा करताना परदेशी बोलत होते. या बैठकीत परिषदेची पुढील वाटचालीसंदर्भात पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. बाल साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याचे तसेच त्यांना पुरस्कार देण्यात यावेत अशी चर्चा होऊन त्यावर एकमत झाले. तालुक्यातील साहित्य प्रेमींना सभासद करून घेण्याबाबतचा ठराव याप्रसंगी सर्वानुमते संमत करण्यात आला.

यावेळी साहीत्य परीषदेचे शिरूर ग्रामीणचे अध्यक्ष शंकरराव नऱ्हे, उपाध्यक्ष बाबा ईनामदार, कोषाध्यक्ष सचिन बेंडभर,  संभाजी चौधरी, संजीव मांढरे, साहेबराव सातपुते आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या