शिरुर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

शिरुर,ता.६ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर नगरपालिकेच्या गुरुवार(दि.५) रोजी सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचुन दाखवावा या साठी सभागृहात विरोधी नगरसेवक मंगेश खांडरे यांनी जोरदार मागणी केल्याने प्रचंड गदारोळात सभेला सुरुवात झाली.

दुपारी तीन वाजता सभेची वेळ असताना सत्ताधारी गटाचे नगरसेवक उशिरा सभागृहात आले. सभा सुरु होताच विरोधी नगरसेवक मंगेश खांडरे यांनी सभेची वेळ हि दुपारी तीन वाजता असुन पीठासीन अधिका-यांसह सर्व सत्ताधारी नगरसेवक हे वेळ न पाळता उशिरा आले.यावर आक्षेप घेत मंगेश खांडरे यांनी सभा जर वेळेवर सुरु करता येत नसेल तर सभेसाठी वेळ देताच कशाला असा सवाल पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांना केला.त्यानंतर पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी या पुढे सर्वसाधारण सभा हि वेळेतच सुरु होइल असे सांगितले.

त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यक्रम पञिकेवरील विषय वाचनास सुरुवात केली असता इतिवृत्त वाचुन मंजुर करणे या पहिल्या विषयास मंगेश खांडरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचुन दाखवावा अशी मागणी सभागृहात केली.याला पीठासीन अधिका-यांसह सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी प्रचंड विरोध करत इतिवृत्त वाचण्याची गरज नसल्याचे सांगत कार्यक्रम पञिकेवरील पुढील विषय वाचुन दाखवावा अशी मागणी केली.याला खांडरे यांनी कडाडुन विरोध करत इतिवृत्त न वाचता तो पुढील विषय घेण्यासाठी कुठला कायदा आहे याची माहिती पीठासीन अधिकारी यांच्याकडे केली.तरीसुद्धा पीठासीन अधिकारी यांनी विरोध करत पुढील विषय घ्या असे सांगताच मंगेश खांडरे यांनी त्याला विरोध करत सभागृहाच्या मोकळया जागेत धाव घेतली.

त्याला सत्ताधारी गटाच्या नगरसेवक मुजफ्फर कुरेशी,संजय देशमुख, अभिजित पाचर्णे,सचिन धाडिवाल, विनोद भालेराव यांनी खांडरे यांना विरोध करत सभागृहाच्या मध्यभागी ठाण मांडले.दोन्ही बाजुने प्रचंड गदारोळ होताच जोरदारपणे दोन्ही गटांनी आपआपले म्हणने मांडले.गदारोळ थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेवटी मंगेश खांडरे यांनी या निर्णयाविरोधात पुढे तक्रार केली जाईल असे सांगत पुढील कामकाज सुरु झाले.

दरम्यान शिरुर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बसण्याची परवानगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महेबुब सय्यद, लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे, शहराध्यक्ष  संदिप कडेकर,मनविसेचे अविनाश घोगरे यांनी (दि.२६) रोजी झालेल्या सभेत बसु न दिल्याने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली होती.त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत शिरुर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आम्ही बसणार अशी भुमिका या चौघांनी घेतली होती. तसेच आजच्या सभेत बसण्यासाठी वरील चौघांनी (दि.४) रोजी  विनंती अर्ज नगराध्यक्षा व मुख्याधिकारी  यांना दिला होता.

त्यामुळे गुरुवार(दि.५) रोजी होणा-या सर्वसाधारण सभेत सभागृहात नागरिक म्हणुन बसण्याची परवानगी देवो अथवा न देवो, आम्ही या सभेला बसणारच अशी भुमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.दुपारी तीन वाजता सभागृहात हे चौघेही येउन बसल्याने संघर्ष होण्याआधीच प्रशासनाकडुन बसण्याची परवानगी देण्यात आली.त्यामुळे काही काळ निर्माण झालेला तणाव निवळला गेला व सभागृहाचे कामकाज सुरु झाले.या निर्णयानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या