शिरुर-हवेलीत इच्छुकांचे 'गुडघ्याला बांशिंग'

No automatic alt text available.शिरूर,ता.७ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरूर - हवेली तालुक्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले असून आमदारकी करिता अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून उभे आहेत,यामुळे शिरूर विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिरूर तालुक्यातून भाजपा आमदार भाजपाकडून उमेदवारी पक्की समजत असून, निवडणुकीला दीड वर्षे अगोदरच त्यांनी विकास कामे शुभारंभ सुरू केला आहे.तीन-चार हजार कोटींची कामे केल्याचा दावा त्यांनी केला आहे.परंतु सध्या त्यांनी केलेला विकास जनतेला दिसत नाही अशी जनतेमध्ये चर्चा आहे तर प्रशासनावर त्यांची पकडही नाही, त्यामुळे नागरिकांमधे नाराजीचा सूर आहे.त्यामुळे त्यांच्या अनेक विकास कामांच्या शुभारंभला गर्दी होत नसल्याची चर्चा भाजपा गटात आहे.प्रशासनावर नसलेली पकड आणि न दिसणारा विकास यामुळे शिरूर - हवेली मधे मात्र भाजप आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या लोकप्रियतेचा टक्का घसरत चालला असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्वादीचे माजी आमदार अशोक पवार यांनी मात्र आमदार बाबूराव पाचर्णे यांना निवडणुकी पराभवानंतर तालुक्यातील साखर कारखाना, जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, नुकत्याच झालेल्या शिरूर पंचक्रोशीतील ग्रामपंचायत मधे पराभवाचा धक्का दिला त्याबरोबर जिल्हापरिषद निवडणुकीत आमदार पाचर्णे यांच्या मुलाला पराभव पत्करावा लागला हा जिव्हारी लागलेला पराभव तोही आमदार पाचर्णे यांच्या बालेकिल्ल्यात हा त्यांना आजही भरून काढता आला नाही.तर माजी आमदार अशोक पवार यांच्या काळात झालेली विकास कामे आज ही जनता त्यांच्या विकास कामाचे कौतुक करत आहे तर त्यांचा प्रशासनावर असणारा पकड कौतुकास्पद होती असे जनता सांगत आहे.उमेदवारीकरिता त्यांना प्रदीप कंद यांचे आवाहन आहे त्यामुळे त्यांनी उमेदवारी करिता कंबर कासावीस लागणार आहे.

हवेली मधून जिल्हापरिषद माजी अध्यक्ष प्रदिप कंद हेही शिरूर विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुक आहे.जिल्हापरिषद अध्यक्ष असताना त्यांनी शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केलेली विकासकामे घेऊन व उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत.प्रदिप कंद यांनी गावा-गावांत दिलेला निधी व कार्यकर्त्यांची मोट बांधली असल्याने माजी आमदार अशोक पवार यांना तडगे आव्हान दिले आहे.तर शिवसेना जर युती झाली नाही तर शिवसेनेकडून  हवेलीचे ज्ञानेश्वर  काकडे हे उमेदवारी करिता इच्छुक असल्याचे चित्र आहे.परंतु मनसे व शिवसेना, कॉंग्रेस यांच्यात आज तरी सक्षम उमेदवार नसला तरी यातील जो कोणी पक्ष उमेदवारी नाकारेल तो गळाला लागू शकतो, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचे आज तरी तळ्यात मळ्यात सुरू आहे. नक्की काय करायचे यांचा पूर्ण अभ्यास त्यांचा दिसत नसल्याने ऐनवेळी त्यांची भूमिका स्पष्ट होते हा त्यांचा नेहमीचा डाव आहे.

एकंदरीत पहाता विधानसभा निवडनुक लोकसभेबरोबर होईल अशी चर्चा आहे परंतु नाही झाली तर सहा महिने उशिरा होणारच आहे त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मधे राष्ट्रवादी कॉंग्रेस,भाजपा,शिवसेना, मनसे यांच्या इच्छुकांनी कंबर कसली आहे.अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.परंतु काही मातब्बर यांचा टक्का वाढला तर काहींचा कमी झाला आहे हे मात्र नक्की खरे !

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या