दुपारचं उद्घाटन राष्ट्रवादीने सकाळीच उरकले... (Video)

Image may contain: 11 people, people smiling, people standingनिमोणे,ता.७ जुलै २०१८(तेजस फडके) : निमोणे येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन पालकमंञ्याच्या हस्ते दुपारी होण्यापुर्वी राष्ट्रवादीने सकाळीच उद्घाटन केल्याने नागरिकांमध्ये  श्रेयवादाच्या जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत.

शिरुर तालुक्यातील निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन आज शनिवार(दि.७) रोजी जिल्हयाचे पालकमंञी गिरीष बापट यांच्या हस्ते दुपारी ठिक ३ वाजता होणार होते.परंतु तत्पुर्वीच राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी बोलताना  माजी आमदार अशोक पवार म्हणाले कि, पालकमंञी गिरीष बापट आणि आमचं काहीच वैर नाही.आमचे नेते अजित पवार व पवार साहेब यांच्या उपस्थितीत एकञित कार्यक्रम करायला हवा होता. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले कि मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कामे केली.गटार लाईन,सिमेंट बंधारा,ग्रामपंचायत इमारत, सिमेंटचे रोड,३५०० कोटी रुपयांची विकास कामे केली.परंतु श्रेय लाटण्याचा प्रयत्न कधी केला नाही.सुमारे ३७५ कोटींची कामे शिरुर-हवेली मध्ये केली पण कधी उदघाटणाचा आग्रह धरला नाही.लाल दिवा स्वतः साठी नाही तर जनतेसाठी आहे.आम्ही फक्त मधला दुवा असुन तुमच्यामुळे आम्हाला सत्ता मिळाली.ज्यांनी काम केलं त्यांना त्या कामाचं श्रेय द्या.

तर जिल्हा परिषद चे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने म्हणाले कि,जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र ५३९ उपकेंद्रातुन गरीबांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या साठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे.स्वर्गीय आर आर पाटील कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात आलं आहे.त्या योजने अंतर्गत मोफत कॅन्सर तपासणी होणार आहे. आदिवासी भागात सर्पदंशच्या लसी व श्वानदंशाच्या लसी उपलब्ध आहेत.आपला हेतू चांगला असला तर अडचण येत नाही.राजेंद्र जगदाळे, अशोक पवार, प्रदिप कंद, सुजाता पवार यांचं कौतुक  करत ते म्हणाले कि जे खरं ते खरं अन खोटं ते खोटं हे सर्व पक्षाचं श्रेय आहे.पदाचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी केला पाहिजे.

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे म्हणाले कि,एखाद्या माणसावर विश्वास ठेऊन त्याची गुणवत्ता वाढावी,म्हणुन बापू प्रयत्न करतात.आपल्या घराचं उदघाटन दुसर्याने करणं अपेक्षित नाही.तसेच संकुचित वृत्ती सोडली पाहिजे व राजकीय नेतृत्वाने संकुचित वृत्तीने राजकारण करणं थांबवावं असं ते म्हणाले.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे म्हणाले कि, अशोक बापू , प्रदीप कंद,बापूसाहेब पठारे, हि सर्व मंडळी राष्ट्रवादी ची आहेत.त्यामुळे उदघाटन करण्याचा अधिकार ज्यांनी काम केलं त्यांनाच आहे.पोरकटपणाचं राजकारण थांबलं पाहिजे.

या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार अशोक पवार, जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे, शिरुर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजेंद्र गद्रे,पंचायत समिती सदस्य राणिताई शेंडगे, पंचायत समिती सदस्य विश्वास कोहकडे, शिरुर तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष कुंडलिक शितोळे, शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष काळे, माजी सरपंच विजय भोस आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या