रांजणगाव देवस्थान कडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Image may contain: one or more people, people standing, crowd, sky and outdoorरांजणगाव गणपती,ता.८ जुलै २०१८(प्रतिनीधी) : श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट तर्फे रांजणगाव व रांजणगाव परिसरातील सात शाळांमधील विद्यार्थ्यांना सुमारे १२००० हजार वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

रांजणगाव देवस्थानच्या वतीने गेल्याकाही वर्षीपासुन नियमित शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले जाते. त्यानुसार या वर्षी श्री मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला व रांजणगाव गावातील सहा वस्त्यांवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

या वहया वाटप प्रसंगी  यावेळी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे, सचिव प्रा.नारायण पाचुंदकर,ग्रा. पं. सदस्य अनिल दुंडे, शाळेतील शिक्षक व  विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या