शिरसगाव काटा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

No automatic alt text available.शिरसगाव काटा,ता.९ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथे तरुणाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत शम्मा गुलाब सय्यद(वय.५०,रा.शिरसगाव काटा शेखवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.तर शफिक गुलाब सय्यद(वय.२४ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार(दि.८) रोजी राञी घरातील सर्वजण जेवण करुन झोपी गेले होते.यातील फिर्यादी यांचा मुलगा शफिक हा घरात झोपी गेला होता.फिर्यादी या पती व धाकटा मुलगा घराच्या पडवीमध्ये झोपले होते.

आज सोमवार(दि.९) रोजी पहाटे पाच वाजता फिर्यादी या घरात गेल्यानंतर मुलगा शफिक याने घराच्या छताच्या लोखंडी चॅनलला टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले.यानंतर फिर्यादी यांनी पती व मुलाला याबाबत सांगितले.शफिक हा जागीच मयत झाला होता.शफिक हा तापट स्वभावाचा व डोक्यात चक्कर असल्याचे फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे.

या घटनेची माहिती कळताच मांडवगण फराटा पोलीस चौकीचे जमादार आबासाहेब जगदाळे यांनी भेट देउन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला आत्महत्येप्रकरणी गु्न्हयाची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या