पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांची: प्रा. सतीश धुमाळ

Image may contain: 25 people, people smiling, outdoorशिरुर,ता.९ जुलै २०१८(प्रतिनीधी) : पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. पर्यावरणाचा विषयाकडे दुर्लक्ष झाल्यास गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल असा इशारा देत पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी व संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष व मातोश्री प्रतिष्ठानचे सचिव प्रा. सतीश धुमाळ यांनी केले.

ते म्हणाले की आज जागतिक तापमान वाढीमुळे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.मोठ्या झपाट्याने झाडांचे प्रमाण कमी होत आहे.अनेकदा अतिवृष्टी,दुष्काळ अश्या संकटाना सामोरे जावे लागत आहे.पाण्याच्या संदर्भात ही त्याचा वापर जागृकतेने करने आवश्यक बनल्याचे धुमाळ म्हणाले.

पृथ्वी वरील जल,जमिन, जंगल यांचे सरंक्षण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या स्वत: पासून पर्यावरण संवर्धन करण्याचा संकल्प करावा. प्रत्येक विद्यार्थ्यानी एक झाड लावावे व त्यांची जोपासना करावी असे धुमाळ म्हणाले.

याच कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन,प्रदूषण व पर्यावरण संवर्धनात नागरिकांची भूमिका याविषयावर  सिया निंबारमुंडे, शुभांगी सुतार  यांनी धुमाळ यांची मुलाखत घेतली. या वेळी पर्यावरणाचे विविध प्रश्न व त्यावरिल उपाययोजना संदर्भात भित्तिचित्रे स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील चित्राचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा हस्ते संस्थेचा आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या