'निमोणे आयडॉल्स' ग्रुप कडून गुणवंतांचा सन्मान (Video)

Image may contain: 6 people, people standing and indoorनिमोणे, ता.१० जुलै २०१८ (प्रतिनीधी) : व्हॉट्सअप वर एकिकडे बंधने घातली जात असताना शिरुर तालुक्यातील 'निमोणे आयडॉल्स' ग्रुप ने सामाजिक कार्याचा आदर्श घालुन दिला आहे.

शिरुर तालुक्यातील निमोणे येथील निमोणे आयडॉल्स या व्हॉट्सअप ग्रुपची काही वर्षांपुर्वी स्थापना झाली.त्यानंतर या ग्रुप ने कोणाचेही पाठबळ न घेता ग्रुप मधील सदस्यांनीच स्वखर्चाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे व्रत स्विकारले.या माध्यमातुन आजपर्यंत गोरगरिब कुटुंबातील विदयार्थ्यांना मदत, जळितग्रस्तांना,आपतग्रस्तांना, तसेच गरजुंना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले.दरवर्षी ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचावा या साठी पाठबळ म्हणुन पुरस्कार देउन सन्मान केला जातो.

या वर्षीही हा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला.या सन्मान सोहळयात क्रिडा मध्ये नैपुन्य मिळविलेल्या ५, दहावी मध्ये चांगले गुण मिळविलेल्या १४, बारावी मध्ये प्रथम श्रेणी मिळविलेल्या ३ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला.तसेच पञकार असुनही शेतीक्षेञात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिंदोडी चे तेजस फडके यांचा सन्मान केला.याशिवाय शिक्षण क्षेञात अध्यापनाचे कार्य करत असुनही सामाजिक क्षेञात उल्लेखनीय कार्य केल्याबदद्ल व आदर्श शिक्षक पुरस्काराबदद्ल बाळासाहेब गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला शिरुरचे नायब तहसिलदार अशोक पाटील, सरपंच उर्मिला काळे, उपसरपंच प्रविण दोरगे,माजी सरपंच जिजाताई दुर्गे, डॉ.पुरुषोत्तम जगदाळे, पांडुरंग दुर्गे, माउली काळे, शेतकरी संघटनेचे भरत काळे, श्रीधर साळुंके, अंकुश जाधव,डॉ.संतोष जाधव, गणेश काळे, मयुर ओस्तवाल,संतोष काळे, सुरेश काळे, लालासो जाधव, जे.आर.काळे, पी.एस.दुर्गे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन गौतम दळवी यांनी केले तर आभार डॉ.पुरुषोत्तम जगदाळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे, कार्याध्यक्ष रोहिदास काळे, गणेश पोपळघट, मच्छिंद्र बांदल, प्रकाश दुर्गे, आर.के.काळे, शामराव जगताप आदींनी विशेष परिश्रम घेतले.

व्हॉट्सअप ग्रुप अनेकदा कित्येक तयार होत असतात परंतु त्यात फार काळ सातत्य राहत नाही.परंतु या ग्रुपने सामाजिक कार्याचा वसा घेत सातत्याने विधायक उपक्रम राबविल्याने शिरुर तालुक्यात नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्यात सामाजिकतेचा नवा आदर्श समाजासमोर घालुन दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या