मलठणला विजेच्या धक्‍क्‍याने तीन कोल्ह्यांचा मृत्यू

मलठण,ता.१० जुलै २०१८(प्रतिनीधी) : मलठण (ता.शिरूर) येथील बोडरे वस्ती परिसरात विजेच्या तार तुटून तीन कोल्ह्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

शिरूरवरून विद्युत पुरवठ्यासाठी मलठण येथे विजेची तार आलेली आहे. या तारेतून मलठण उपकेंद्राला विजेचा पुरवठा केला जातो. तेथून या परिसरात वीजपुरवठा होत असतो. गुरुवारी (ता. 5) रात्री बोडरे वस्तीवरील विजेची तार तुटली. त्यातून विजेचा धक्का बसल्याने तीन कोल्ह्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये पूर्ण वाढ झालेला एक नर व दोन मादी होती. याबाबत शनिवार (ता. 7) वनविभागाला कळविण्यात आले. त्या वेळी घटनेचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले.

दरम्यान, दोन दिवस हे कोल्हे जागेवरच असल्याने दुर्गंधी सुटली होती. या भागात विद्युत वाहक तारा अनेक वर्षांपूर्वीच्या असून, त्या बदलणे अपेक्षित आहेत. वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने दक्ष राहणे आवश्‍यक असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या