शिरुरच्या पुर्व भागात उस लागवडी रखडल्या

शिरुर,ता.११ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात समाधानकारक पाउस न झाल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागुन राहिले आहेत तर दुसरीकडे घोडनदी पाञ कोरडे ठणठणीत पडल्याचे चिञ दिसुन येत आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाउस पडत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्वभागात अद्याप एकाही मोठ्या पावसाने हजेरी लावलेली नाही.साखर कारखान्यांच्या धोरणाप्रमाणे या पुर्व भागात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच उस लागवडी करणे अपेक्षित असल्यामुळे अनेक शेतक-यांनी शेतीच्या पुर्व मशागती करुन ठेवलेल्या आहेत.परंतु पाउस लांबला गेल्याने या लागवडी करण्यासाठी शेतक-यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे साखर कारखान्यांच्या धोरणांप्रमाणे उस लागवडी करणे सध्यातरी शक्य होत नसल्याचे काही शेतक-यांमध्ये बोलले जात आहे.शिरुरच्या पुर्वभागात शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी, कुरुळी, या गावांमध्ये पाण्याचे अजुनही दुर्भिक्ष जाणवत असुन उन्हाळी पिके पाण्याअभावी पिके जळाली गेली असल्याचे चिञ दिसत आहे. तसेच या भागांमध्ये शेतक-यांनी केलेल्या फळभाज्यादेखील पाण्याअभावी जळुन जाउ लागल्या आहेत.जी पिके कशीबशी तग धरुन आहेत तीही जळुन जाण्याच्या मार्गावर आहेत.

पाउस नसल्याने मजुरांनाही कामे मिळत नसल्याचे चिञ या भागात दिसत आहे.पाउस न झाल्याने जनाव-यांच्या चा-याचा प्रश्न शेतक-यांसमोर आ वासुन उभा राहिला असुन असेच चिञ कायम राहिले तर जनावरे जगवायची कशी असा सवाल परिसरातील शेतक-यांकडुन केला जात आहे.इनामगाव, मांडवगण फराटा परिसरात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात असुन याचा दुधधंद्यावर परिणाम होण्याची शक्यता इनामगाव चे उपसरपंच शिवाजी मचाले यांनी बोलताना व्यक्त केली.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात मुग व बाज-यांच्या पेरण्या माञ खोळंबल्या असुन पेरण्यांचा हंगाम वाया जाण्याची भिती शेतक-यांकडुन व्यक्त केली जात आहे.त्यामुळे या भागात जोरदार पाउस व्हावा यासाठी शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागुन राहिले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या