तांदळीत सर्पमिञाने पकडला अतिविषारी कोब्रा नाग

Image may contain: 6 people, people smiling, people standing and outdoorतांदळी,ता.११ जुलै २०१८(प्रतिनीधी)  : तांदळी(ता.शिरुर) येथे सर्पमिञांनी मोठ्या शिताफीने अतिविषारी कोब्रा जातीचा सुमारे पाच फुट लांबीचा नाग पकडला.

याविषयी अधिक माहिती अशी कि, तांदळी(ता.शिरुर) येथील माळवाडीत पांडुरंग धोंडे यांच्या घरालगत विटांमध्ये साप असल्याचे निदर्शनास आले होते.याबाबत त्यांनी सर्पमिञ सुनिल कळसकर यांना माहिती दिली.माहिती कळताच कळसकर यांनी विटांमध्ये बारकाईने पाहिले असता नाग असल्याचे दिसले.या वेळी कळसकर यांनी मोठ्या शिताफीने कोब्रा नागास पकडले.या नागाविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, हा अतिविषारी(कॉमन कोब्रा) या जातीचा, तपकिरी रंगाचा, पाच फुट लांबीचा नाग असुन निसर्गाच्या सान्निध्यात सोडला जाणार आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असुन शेतात तसेच अडगळींमधुन साप बाहेर येत असुन नागरिकांनी घाबरुन न जाता सर्पमिञांना तत्काळ कळवावे.तसेच घराबाहेर, घराजवळ अनाश्यक वस्तुंचा ढिग करणे टाळावे,घराबाहेरील जागेत पाण्याची टाकी, हौद, नळ, किंवा विहिरीजवळ पाणी सांडुन ओल राहणार नाही याची दक्षता घ्यावी.या प्रसंगी किरण कळसकर, शरद गदादे, विक्रम शिंदे, मनोज चौधरी, अमोल पाटोळे, गोविंद शेलार, कमलेश गुंजाळ, शांताराम गदादे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या