काव्य हा माणूस बनविण्याचा धागा - कवी चांदगुडे

Image may contain: one or more peopleनिरगुडसर,ता.११ जुलै २०१८(प्रतिनीधी) : कवितेतून कवीने गांभीर्यपूर्वक आशय मांडुन एक परिवर्तनाची हाक दिलेली असते काव्यातून उत्तम साध्य मांडलेले असते हेच साध्य माणुसपण बनविण्याचा धागा असते असे मत प्रसिद्ध ग्रामीण कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले .

कवी-लेखक आपल्या भेटीस उपक्रमा अंतर्गत अवसरी बु.(ता.आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक  शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता आठवीच्या नवीन मराठी पाठयपुस्तकात शेतकऱ्याच्या जिवनाची व्यथा मांडणारी " आळाशी " नावाची  कविता आली असून या कवितेचे कवी स्वतः हनुमंत चांदगुडे यांनी ती कवितागाऊन दाखवली व अर्थपूर्ण  शिकवली यावेळी विधार्थ्यांनी प्रतिसाद दिला. विविध विषयावर विध्यर्थ्याना प्रबोधन केले.

कवी-लेखक आपल्या भेटीस हा उपक्रमाचे अविष्कार विठ्ठल वळसे याच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच विधार्थ्यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध युवा कवी व साहित्यिक सचिन बेंडभरपाटील उपस्थित होते. यावेळी चांदगुडे यांनी मार्गदर्शन करताना बा आनवाणी पायाचा..ठसा मातीत उठतो,भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो.. अश्या  शेतकऱ्यांच्या जीवन प्रवासाची चित्रकथा मांडली.

यावेळी विधार्थ्यांनी जीवनात समाज टिकवण्यासाठी लिहिले पाहिजे.  नवीन उमेद जागवली पाहिजे असे मत व्यक्त केले .यावेळी बेंडभर पाटील यांनी बाह्यशिक्षण व अवांतर वाचन याने  शैक्षणिक पातळी सुधारत असल्याचे मत व्यक्त केले यासाठी पालकांनी पाल्यांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे सांगितले यावेळी पोलीस पाटील, पत्रकार  विठ्ठल वळसे पाटील, शाळा पर्यवेक्षक सुपीकर  जे. ए .,शिक्षक नंदकुमार लंगडे , मंगल  कुंभार, वैशाली चौधरी  उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक  शिक्षक सुरेश जारकड यांनी तर आभार नवनाथ टाव्हरे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या