कान्हुर मेसाईला शास्ञ व वाणिज्य शाखा सुरु

Image may contain: 5 people, people smiling, people standingकान्हुर मेसाई,ता.११ जुलै २०१८(प्रतिनीधी) : कान्हुर मेसाई(ता.शिरुर) येथील विद्यालयात वाणिज्य व शास्ञ शाखेचे नुकतेच मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भास्कर पुंडे यांनी दिली.

खेड्यातील शाळाही शहरी भागाशी स्पर्धा करत असुन हे चिञ आशादायी आहे.विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार दर्जेदार शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी वसुंधरा पुंडे(बारवे) यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर पुंडे हे होते.

चालु वर्षी प्रथमच या विद्यालयात शास्ञ व वाणिज्य शाखा सुरु केल्याने विद्यार्थ्यांसह परिसरातील पालकांनी समाधान व्यक्त  केले असुन उत्तम प्रतिसाद मिळत आहेत.या शाखांचा उद्घाटन समारंभ उपजिल्हाधिकारी बारवे, उद्योजक केरुभाउ नाणेकर,सुरेकहा नाणेकर, माजी सैनिक नानासाहेब फुलसुंदर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी केरभाउ व सुरेखा नाणेकर यांच्याकडुन ५ लाख रुपये मदतनिधीचा धनादेश विद्यालयाकडे सुपुर्त करण्यात आला.शिक्षक व सेवक पतसंस्थेनेही १ लाख ५१ हजार रुपयांचा मदतनिधी दिला. तर स्वर्गीय फक्कडराव पुंडे यांच्या स्मरणार्थ सुधीर पुंडे यांनी ५१ हजार रुपये, माजी उपसरपंच दिपक तळोले व रामकृष्ण पुंडे यांनी ११ हजार रुपये मदत शाळेस जाहिर केली.

या कार्यक्रमाला माजी प्राचार्य भाउसाहेब पुंडे,सेक्रटरी गंगाधर पुंडे,मंडळाचे उपाध्यक्ष तानाजी खर्डे, लहु तळोले, आनंदराव तळोले, आण्णासाहेब साकोरे, माजी सरपंच सविता पुंडे, सरपंच दादासाहेब खर्डे, उपसरपंच सलमा तांबोळी यांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. अनिल शिंदे यांनी केले तर स्वागत प्राचार्य मच्छिंद्र माने यांनी केले. आभार प्रा. दत्ताञय खोडदे यांनी मानले.
No automatic alt text available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या