पालखी सोहळ्याचे आंधळगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान

Image may contain: 10 people, people smiling, people standing, crowd, wedding and outdoorआंधळगाव,ता.१२ जुलै २०१८(प्रमोल कुसेकर): विठ्ठलाच्या भेटीसाठी खरा भक्त हा हा पंढरीच्या वारीकडे डोळा लावुन बसलेला असतो.विठ्ठलाच्या भेटीसाठी तहानलेला असतो.कधी एकदा आषाढी एकादशी येते ही भावना मनात घेऊन वर्षभर वाट पाहत असतो.आंधळगाव(ता.शिरुर) येथील सद्गुरु दादामहाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात पंढरपुरकडे प्रस्थान झाले.

आंधळगाव ग्रामस्थांच्या वतीने गेल्या ७ वर्षापासून आंधळगाव ते पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते.बुधवारी (दि.११)दुपारी २ वा पालखीचे प्रस्थाननिमित्त मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती.
यावेळी आंधळगाव सोसायटीचे अध्यक्ष आदिकराव कुसेकर,राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोरेकर,पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले यांच्या हस्ते विणापुजन झाले.टाळ- मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम महाराज यांचा जयघोष करत दिंडीतील वारकर्यानी गावाला प्रथम ग्रामप्रदक्षिणा पुर्ण केली.

यामध्ये भजनी मंडळ ,महिला वारकरी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.रथासाठी बैलजोडी श्री,बाबासाहेब रामचंद्र कुसेकर यांनी दिली होती.दिंडी सोहळ्याला उपस्थित ग्रामस्थांमध्ये सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प रामदास महाराज साठे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, सरपंच नंदकुमार दाभाडे, बिपीन कदम,पोलिस पाटील चंद्रकांत कुसेकर, गोरक्ष ओव्हाळ,रघुनाथ पांढरे, सावळेराम पांढरे, भिमराव पांढरे, पञकार प्रमोल कुसेकर आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंधळगाव येथील दिंडी ही गेल्या सात वर्षापासून वारीची परपंरा अखंडपणे जपत असून तीनशे वारकरी या वारीत सहभागी आहेत.तसेच यावर्षी प्लास्टिकमुक्त मोहीम राबवणार असल्याचे आणि कागदी पिशव्या वापण्यावर भर देणार असल्याचे अध्यक्ष ह.भ.प रामदास महाराज साठे यांनी सांगितले.यावेळी हा पालखी  सोहळा कडेठाण, वासुंदे, पारवडी, इंदापुर, कळंब, लाखेवाडी, अकलुजमार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या