शिरुर तालुक्यात केवळ ८ टक्केच खरीपाची पेरणी

Image may contain: one or more people and outdoorशिरुर,ता.१२ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने केवळ आठ टक्के क्षेञावरच खरीप पिकांची पेरणी झाली असुन हातची पिके गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

शिरुर तालुक्यात जुन महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.पेरण्यायुक्त पाउस माञ कुठेही न पडल्याने शेतक-यांच्या हक्काचे असलेले नगदी पिक म्हणुन मुग, मटकी, चवळी, तुर,हुलगा अशी खरिप पिके आज पावसाअभावी पेरली गेली नाही.संपुर्ण शिरुर तालुक्यात नगदी पिकांची आजतागायत ८ टक्के इतकीच पेरणी झाल्याची आकडेवारी उपल्ब्ध आहे.गेल्यावर्षी वेळेवर पाउस झाल्याने मटकी, मुग,चवळी, तुर,यांसारखी कडधान्य पिकांची वेळेवर पेरणी झाली होती.त्यामुळे शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीत काहिशा उशिराने या मालाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली होती.

शिरुर तालुक्यात गतवर्षी ८ हजार ३०० हेक्टर क्षेञावर कडधान्य पिकांची पेरणी झाली होती.या वर्षी केवळ ११५६ हेक्टर इतकीच पेरणी होउ शकली आहे.उडीद या पिकासाठी गेल्यावर्षी ३०० हेक्टरवर पेरणी झाली होती त्या तुलनेत या वर्षी ३६ हेक्टर वर पेरणी झाली आहे.तुर सुमारे ६९४ हेक्टर मागील वर्षी  पेरली गेली होती ती या वर्षी केवळ ५० हेक्टर इतकीच पेरली गेली आहे.गेल्या वर्षी या महिना अखेर शिरुर तालुक्यात १३९ मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर या वर्षी या महिना अखेर फक्त ३० ते ४० मी.मी इतकाच पाउस पडला असल्याची नोंद झाली आहे.त्यामुळे खरीप हंगामातील शेतक-यांची हक्काची असणारी व कमी पाण्यावर येणारी कडधान्ये पिके पावसाने दडी मारल्याने पेरणी होउ न शकल्याने शेतकरी वर्गाबरोबर व्यापारी वर्गही चिंतेत आहे.

हि सर्व नगदी पिके  असल्याने शेतक-यांचे वर्षाचे आर्थिक गणित त्यावर अवलंबुन असते.माञ हातची पिके गेल्याने त्यांचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडुन जाण्याची शक्यता  व्यक्त केली जात आहे.यामुळे जपळपास दहा कोटी रुपयांचा फटका शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीसह शिरुरच्या मुख्य बाजारपेठेवर होण्याच्या शक्यता व्यापारी व शेतकरी वर्गाकडुन व्यक्त केल्या जात आहेत.या विषयी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी यांनी बोलताना सांगितले कि, शिरुर तालुक्यात खरीप पिकाच्या पेरन्या न  झाल्याने बाजार समितीत कडधान्य पिकांची आवक मोठ्या प्रमाणावर घटणार असुन त्याचा मोठा परिणाम बाजारसमितीच्या उत्पन्नावर होण्याची भिती निर्माण झाली आहे.तसेच शिरुर बाजारसमितीत शिरुर, पारनेर,श्रीगोंदा या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री साठी येत असतात.त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी भंडारी यांनी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या