शिरुर तालुक्यातील जनावरांची तपासणी करावी

Image may contain: 11 people, people smiling, people standingशिरुर,ता.१२ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील शेतक-यांच्या पाळीव जनावरांची(पशुधनाची) तपासणी करुन लसीकरण करण्याची मागणी शिरुर तालुका शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आली.

या संबंधी नुकतेच शिरुर पंचायत समितीला शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.त्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, बदलत्या निसर्गाच्या लहरीपणामुळे तापमान,हवामान यांमुळे विषाणुंमुळे जनावरे या कालखंडात आजारी पडतात.जनावरांना योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपचार न मिळाल्याने जनावरे दगावतात.पशु चिकित्सा मार्गदर्शन शिबिर नसल्याने शेतक-यांना आपल्या जनावरांना गोचीड ताप,लाळ खुरकत,फ-या, घटसर्प,अॅन्थ्रॅक्स,मानमोडी या आजारांना सामोरे जावे लागते.सर्व जनावरांसाठी सरकार जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत लाखो रुपयांचा निधी खर्च करतो.त्यामुळे पंचायत समितीमार्फत त्वरीत उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ,भरत थोरात, विभागप्रमुख सुनिल जठार,महिला आघाडीच्या विजया टेमगिरे,सोपान जाधव, शैलजा दुर्गे, अनघा पाठक, निखिल ओव्हाळ, रावसाहेब वाळुंज आदी उपस्थित होते.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या