विद्यार्थ्यांनी मोबाइलपासुन दुर रहावे : राजाराम शिंदे

Image may contain: 22 people, people smiling, people standing and outdoorदहिवडी, ता.१३ जुलै २०१८(प्रतिनीधी) : विद्यार्थ्यांनी प्रमाणिपणे अभ्यास करुन व वडीलधाऱ्यांचा आदर ठेवून मोबाईलचा वापर कमी केला तर नक्कीच जीवनात यशस्वी होता येईल असे प्रतिपादन संभाजी भुजबळ पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम शिंदे यांनी केले.
 
दहिवडी (ता.शिरुर) येथील जि.प.प्राथमिक शाळेत गुरुवार (दि.१२ जुलै) रोजी तळेगाव ढमढेरे येथील संभाजी भुजबळ पतसंस्था व नानाभाऊ उबाळे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे बोलत होते.

यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष गोरक्ष काळे, सदस्य राजेंद्र जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अरुण भुजबळ, उद्योजक रमेश भुजबळ, अशोक भुजबळ, मंदा इथापे, झुबेदा सय्यद, मुख्याध्यापिका ताठे, जालिंदर पवार, नानाभाऊ उबाळे, आबा उकले आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या