शिरुर शहरात प्लॅस्टिक बंदीचा उडालाय बोजवारा

No automatic alt text available.
शिरुर, ता.१३ जुलै २०१८(प्रतिनीधी) : राज्य शासनाने पंधरा दिवसांपुर्वी प्लॅस्टिकवर बंदी जाहिर केली होती त्या प्लॅस्टिक बंदीचा शिरुर शहर व परिसरात पुर्णपणे बोजवारा उडाला असून शहरात  व उपनगरात सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री सुरु आहे.

शासनाने पंधरा दिवसांपुर्वी संपुर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी जाहिर केली. या निर्णयाचे सर्वञ स्वागत करण्यात आले. त्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शासकिय पातळीवर यंञणा सज्ज झाली. माञ शिरुर शहरातील शिरुर नगरपरिषदेच्या वतीने या निर्णयाबाबत उदासिनता  दिसून येत आहे. या निर्णयासंदर्भात व्यापा-यांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असताना नगरपरिषदेकडून तसा कुठलाही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. फक्त काही व्यापा-यांना बोलावुन नगरपरिषदेच्या कार्यालयात प्लॅस्टिक बंदी संदर्भात बैठक घेण्यात आली. या पलीकडे नगरपरिषदेने कुठलीही उपाययोजना केलेली दिसत नाही. प्लॅस्टिक बंदीसारख्या महत्वाच्या निर्णयावर नगरपरिषदेने गांभिर्याने या निर्णयाची अंमलबजावनी करण्यासाठी पथक तयार करणे गरजेचे असताना तसा कुठलाही प्रयत्न नगरपरिषदेकडुन झाल्याचे दिसत नाही. या निर्णयाबद्दल आम्हांला काही देणे घेणे नसल्याच्या अविर्भावात शिरुर नगरपरिषद वावरत असल्याचे चिञ सध्या दिसत आहे.

शिरुर शहर हे शिरुर,श्रीगोंदा, पारनेर या तीन तालुक्याची बाजारपेठ असुन या ठिकाणी कापड, किराणा, सोन्याचे व्यापारी यांसह छोट्या-मोठ्या व्यावसायाची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली आहेत.माञ या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर केवळ एकाच जणावर कारवाई करण्यात नगरपरिषदेला यश आले. एवढ्या मोठ्या बाजारपेठेवर  फक्त एकावरच कारवाई होते यांसारखे मोठे दुर्दैव नाही. आज शहरात सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्या अनेक  हॉटेल, दुकाने, हातगाड्या, फळविक्रेते, किराणा दुकाने, धाबे, मिठाई दुकाने, स्टेशनरी यांसारख्या ठिकाणी आजही प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री सुरु असून शासनाचा नियम धाब्यावर बसवला असल्याचे चिञ दिसत आहे. शिरुर नगरपरिषदेकडून या कडक निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे असताना केवळ स्वत:चे हित संबंध जपुन व्यापा-यांवर शिरुर नगरपरिषदेच्या कर्मचा-यांकडून कारवाई होताना दिसत नाही. शिरुर शहरालगत  असणा-या तर्डोबाची वाडी  व शिरुर ग्रामीन या ग्रामपंचायत हद्दीतील बाबुराव नगर येथील दुकानातुन सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर चालू असुन शासनाचा नियम पायदळी तुडवला जात आहे.

शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाला शासकिय पातळीवर बळ मिळणं गरजेचे असताना नगरपरिषद,ग्रामपंचायत या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कच खाउ लागली तर शासनाचा निर्णय प्रत्यक्षात कधी अंमलात येणार? शिरुर शहरात आज या निर्णयाबाबत शुन्य टक्के जनजागृती झाली आहे. नगरपरिषदेकडून या निर्णयाबाबत जनजागृती पर पोस्टर,सार्वजनिक ठिकाणी बॅनर, पञके, रिक्षातुन प्रचार, आदी अनेक माध्यमातुन जनजागृती करणे गरजेचे असताना यातील कुठलाही पर्याय नगरपालिकेने राबविला नाही.

या संदर्भात नगरपरिषदेचे स्वच्छता  विभागाचे निरीक्षक दत्ताञय बर्गे यांच्याशी संपर्क साधला असता, आजवर एका व्यापा-यावर कारवाई करण्यात आली असुन दोन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. इतर ठिकाणी काहीही प्लॅस्टिक आढळुन आले नाही असे सांगितले. त्यामुळे शिरुर शहरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी होइल की नाही याबाबत मोठी साशंकता निर्माण झाली असुन शासनाचा कायदा असाच हवेत विरुन जाणार का असा  सवाल सर्वसामान्यांकडून केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या