...अन आर.आर. पाटील रमले जुन्या आठवणीत

Image may contain: 4 peopleनिमोणे,ता.१३ जुलै २०१८(प्रतिनीधी) : स्वत:ची दुचाकी विकुन उसने पैसे घेउन ट्रॅक्टर विकत घेतला अन निमोणे व करडे परिसरात शेतीची कामे केली..अशा प्रकारच्या जुन्या आठवणी सांगण्यात रमले होते जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र रणजित जगदाळे (पाटील)...

निमोणे येथे प्रकाश दुर्गे या सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त जि.प. राजेंद्र जगदाळे आले होते.या वेळी ग्रामस्थांच्या सत्कारानंतर जुन्या आठवणीत ते रमुन गेले होते.

जि. प. सदस्य राजेंद्र रणजित जगदाळे (पाटील) करडे व परिसरात आर.आर.पाटील या नावानेच परिचित आहेत. मुळचे शेतकरी कुटुंबातील असलेले जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील यांची सुरुवात शुन्यापासुन झाली होती.आयुष्याचा प्रवास उलगडताना त्यांनी परिसरातील असणारा स्नेह व्यक्त करत जुन्या आठवनींना उजाळा दिला. व्यवसायाची सुरुवात करताना त्या वेळी फारसे भांडवल नव्हते. ट्रॅक्टर घ्यायचा होता. परंतु, जवळ तेवढे पैसे नव्हते. मग जुनी स्पलेंडर गाडी होती, ति विकुन उसने पैसे घेउन ट्रॅक्टर विकत घेतला. राञीचा शेतीची लेवलिंगची, मशागतीची कामे केली. सर्व प्रकारची कामे केली. विहिरीवर ब्लस्टिंगसाठी कामे करणे जिकिरीचं असायचं तरीही जिवावर उदार होउन कामे केली. अशा प्रकारच्या जुन्या आठवनींना त्यांनी उजाळा दिला.

निमोणे या गावाने नेहमी भरभरुन दिले असुन निमोणे करांचे ऋण कदापी विसणार नसल्याचे ग्रामस्थांशी बोलताना त्यांनी सांगितले. तर जिल्हा परिषद असुनही सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी येउन आपुलकीने सर्वांची विचारपुस केल्याने निमोणेकर यावेळी चांगलेच भारावुन गेले होते.

या प्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे, कार्याध्यक्ष रोहिदास काळे, निमोणे आयडॉल्सचे प्रमुख पञकार बाळासाहेब गायकवाड, भरत काळे, मच्छिंद्र बांदल, आबासाहेब थोरात, गणेश पोपळघट आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या