शिरुरच्या पुर्व भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Image may contain: grass, plant, sky, outdoor and natureन्हावरे,ता.१४ जुलै २०१८(प्रतिनीधी) :  इनामगाव,तांदळी, शिरसगावकाटा, निर्वी, पिंपळसुटी,कुरूळी या गावांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणू लागली आहे तसेच उभी पिके पाणी उपलब्ध नसल्यामुळे जळून जाउ लागली आहेत. बोअरवेल, नदी,ओढेनाले कोरडे ठणठणीत पडले आहेत. या भागामध्ये पाउसच पडला नसल्यामुळे पेरण्या देखील रखडल्या गेल्या आहेत.त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

या परीसरामध्ये अदयपी जोरदार स्वरूपाचा पाउस पडला नसल्यामुळे मजूरी करणारयां मजूरांना काम मिळत नसल्यामुळे अवघड झाले आहे. तसेच काही कंपन्यांना पाण्याची कमतरता जाणवू लागल्यामुळे काही बेरोजगार तरूणांचा नोकरीचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे.शिरूरच्या पूर्वभागातील घोडनदीपात्रातील पाणीसाठा कमी प्रमाणात होत चालला असल्यामुळे पुन्हा एकदा शिरूर व श्रीगोंदा तालूक्यातील शेतकरयांना दूष्काळाचा सामना करावा लागणार आहे.घोडनदीपात्रामध्ये जेवढे कोल्हापूरी पदधतीचे बंधारे आहेत ते सर्व बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत.

शिरूरच्या पूर्वभागामध्ये तांदळी,नलगेमळा, पिंपळसुटी, शिरसगाव काटा या गावातील शेतकरयांची शेती घोडनदीच्या पाण्यावर अवलंबून असते. पण दरवर्षी या भागातील शेतकरयांना दुष्काळाचा सामना करावा लागतो व पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येते ज्यावेळी घोडनदीला पाणीसाठा मोठया प्रमाणात उपलब्ध असतो.त्यावेळी मात्र कोल्हापूरी पदधतीच्या बंधारयामध्ये पाणी अडवण्याकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असते.त्यामुळे त्याचा फटका ऐन उन्हाळयात या भागातील शेतकरयांना बसतो.

सर्वच नवीन ढापे या कोल्हापूरी पदधतीच्या बंधारयांना टाकली असती तर निदान पिण्यापुरते तरी पाणी या कोल्हापूरी पदधतीच्या बंधारयामध्ये शिल्लक राहिले असते काही नवीन व काही जुनी ढापे या कोल्हापूरी पदधतीच्या बंधारयांना टाकाली होती तरी देखील पाणी पूर्णपणे संपलेला आहे.कोल्हापूरी पदधतीच्या बंधारयावर जेवढे ढापे आहेत त्यातील काही ढापे पूर्णपणे कुजली गेली आहेत.त्यामुळे चालू वर्षी संबंधीत विभागाने बंधारे अडवताना संपूर्ण नवीन ढापे टाकावी अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद गद्रे यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या