आलेगाव पागाला विहीरीत पडलेला बिबट्या जेरबंद

No automatic alt text available.आलेगाव पागा,ता.१४जुलै २०१८ (प्रमोल कुसेकर): आलेगाव पागा(ता.शिरुर) येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश आले.

सविस्तर असे कि,आलेगाव पागा (ता.शिरुर)येथील शेतकरी प्रकाश रुणवाल यांच्या शेतात जयसिंग निंबाळकर खत टाकण्यासाठी गेले असताना शेजारच्या विहिरीत पाण्याच्या आवाज आल्याने त्यांनी डोकावून पाहीले असता एका लाकडाला लटकलेला बिबट्या सदृश्य प्राणी दिसला.यावेळी विहीरीकडे स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली असता ग्रामस्थांच्या सहकार्याने एका शिडीला दोराच्या साहाय्याने पाण्यात सोडून बिबट्याला सोडलेल्या शिडीवर घेऊन पाण्यापासुन काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी वर खेचले.
Image may contain: 8 people, tree and outdoor
विहीरीत बिबट्या पडला असल्याची माहीती तत्काळ शिरुर वनपरिक्षेञाचे अधिकारी श्री.तुषार ढमढेरे यांना देण्यात आली.काही वेळातच वनरक्षक भानुदास  शिंदे यांच्यासह इतर  कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.शिरुर वन परिक्षेञ अधिकारी तुषार ढमढेरे व जुन्नर उपवन अधिकारी अर्जुन म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नरहुन सायंकाळी  ६ च्या सुमारास रेसक्यु टिम घटनास्थळी दाखल झाली.रेसक्यु टिममध्ये डाँ.अजय पाटील,सलिम शेख,वनपाल एस.एल.गायकवाड ,वनपाल चारुशिला कारे,आनिता होले आदीनी विहीरीत पिंजरा सोडुन काही क्षणातच पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद केला.यावेळी विजय बेनके,आशिष दरडा,दिलीप नहार,उद्धव भोसले,महेश वाघचौरे, झाकीर शेख,सचिन शेलार ,अनिल रासकर आदी ग्रामस्थांनी रेसक्यु टिमला यावेळी मदत केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या