शिरुर शहरात अल्पवयीन मुलांची दुचाकींवरुन धुम...

No automatic alt text available.शिरुर,ता.१४ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर शहरात अनेक अल्पवयीन मुले शहरात दुचाकी वाहने भरधाव वेगाने घेउन तसेच कर्णकर्कश्श आवाजात हॉर्न वाजवताना दिसत आहे.१८ वर्षांखालील अनेक लहान मुले शहरातुन बिनधास्त वाहने चालवत आहे.एवढेच नव्हेतर शाळा-महाविदयालयात जाणारी मुले संबंधित ठिकाणी घरची दुचाकी घेउन जात आहेत.त्यामुळे कायदा हा नेमका कोणासाठी आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

शिरुर शहराच्या विस्तारीकरणामुळे दुचाकींच्या संख्येत वाढ झाली असल्याचे पहावयास मिळत असुन शहराच्या आजुबाजुच्या परिसरात नवनवीन शाळा व महाविदयालये सुरु होत आहे.तेथे जाण्यासाठी पालकांना दुचाकींची गरज पडते.अनेक दुचाकी शहरात नव्याने दाखल होत आहेत.माञ त्याचा उलटा परिणाम सध्या सर्वञ दिसत आहे.शहरातील अनेक शाळा-क्लासेस या सकाळच्या सञात भरतात.त्यामुळे अनेक अल्पवयीन मुले सर्रासपणे शाळा व क्लासला दुचाकी घेउन जातात.तसेच शहरातील महाविद्यालयात सुद्धा हीच परिस्थिती असुन राज्य सरकारने या संदर्भात अल्पवयीन मुला-मुलींना दुचाकी वाहन चालविताना पकडल्यास संबंधित पाल्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करावा असा  कायदा केला असुन सुद्धा या कायद्याची कुठेच अंमलबजावणी शिरुर शहरात होताना दिसत नाही.आजही इ.५वी पासुन ते १२ वी पर्यंत मुले-मुली सर्रासपणे व बिनधास्त शहरातुन ट्रिपल सिट वाहने चालविताना दिसत आहे शासनाचा कायदा कुठेच पाळला जात नसल्याचे चिञ  शिरुर शहर व परिसरात दिसत आहे.

या संदर्भात पालकांनी काळजी घेणे गरजेचे असतानाही बिनधास्त पणे पाल्याच्या हातात गाडी देत असतात.कुठल्याही प्रकारचे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहन चालविणे हा गुन्हा असताना वाहतुक पोलीस कर्मचारी कुठेही अल्पवयीन मुलांवर कारवाई करताना दिसत नाही.या संदर्भात शिरुर पोलीसांनी व प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी शाळा व महाविद्यालयात प्रबोधन करुन मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.शहरातील महाविद्यालयात सदर शाळेतील व महाविद्यालयातील संस्थेतील पदाधिकारी,प्राचार्य यांनी पालक सभेवेळी पालकांचे अल्पवयीन मुलांना दुचाकी न देण्यासंदर्भात प्रबोधन करणे गरजेचे आहे.

या संदर्भात चां.ता.बोरा महाविद्यालयातील पर्यवेक्षिका सुनिती चौधरी यांनी सांगितले कि, कर्नाटक राज्याप्रमाणे आपल्या राज्यातही या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.शिरुर शहरात अल्पवयीन मुलांचे दुचाकी चालविण्याचे प्रमाण चिंताजनक असुन पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीची गरज आहे.पोलीसांनी कडक कारवाई करणे अपेक्षित आहे.दुचाकी न देण्याबाबत पालकांनी विचार करायला हवा असे मत व्यक्त केले.या संदर्भात शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयात प्रतिक्रिया घेतल्या असता नाव न छापण्याच्या अटीवर असे सांगितले कि, आम्ही मुलांना समजावण्यास गेल्यास याचा उलटा परिणाम संबंधित शिक्षकाला भोगावे लागतात. पोलीस या बाबत  ठोस भुमिका घेत नसल्याने आम्हीच का  वाईटपणा घ्यायचा, पालकांनी विद्यार्थ्यांच्या हट्टाला न जुमानता दुचाकी देणे बंद केले पाहिजे यांवर हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत अनेकांनी मांडली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या