शंकेश्वर पालखीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान (Video)

Image may contain: 5 people, people standing, crowd and outdoorशिरसगाव काटा,ता.१५ जुलै २०१८(प्रतिनीधी) : 'धन्य धन्य जन्म तयांचा..जाई नेमी पंढरीसी' असे म्हणत टाळघोषाच्या गजरात व मृदुंगाच्या निनादात मोठ्या भक्तीमय वातावरणात शिरसगाव काटा (ता.शिरुर) शंकेश्वर महाराज पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान झाले.

शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथील शंकेश्वर महाराज प्रासादिक पायी दिंडी सोहळयाचे हे पाचवे वर्षे असुन अखंडपणे सुरु आहे.शनिवार (दि.१४) रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते कलश,तुलशी,विना,रथ पुजन करण्यात आले.या नंतर टाळ व मृदुंगाच्या गजरात पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान करण्यात आले.
Image may contain: 2 people, wedding, crowd and outdoor
मानेमळा,फराटेवाडी येथे ठिकठिकाणी स्वागताला रांगोळी काढण्यात आली.तसेच पालखी मार्गावर चहापान व नाष्टयाची सोय केलेली होती.शंकेश्वर महाराज पालखीचे पंढरपुर पर्यंत एकुण नउ मुक्काम होणार असुन ठिकठिकाणी भजन, किर्तन व हरिजागर केला जाणार आहे.त्याचप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.या पालखी सोहळ्यात चोपदार म्हणुन गुलाब केदारी, प्रविण गोरे, दत्ताञय लोंढे आदी काम पाहणार असल्याची माहिती दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक बबनदादा कदम यांनी दिली.
Image may contain: 2 people, sky and outdoor
प्रस्थानप्रसंगी  घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष कळसकर,शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजेंद्र गद्रे,रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, सरपंच सतीश चव्हाण,सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बबनराव कदम,माजी सरपंच संजय शिंदे,माजी उपसरपंच प्रकाश जाधव,माजी चेअरमन विनायक जगताप, शिवाजी काटे, मच्छिंद्र इंगळे,प्रविण कदम,सुभाषदादा फराटे आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या