विरोधी दिशेने आलेल्या वाहनाने घेतले तिघांचे बळी

Image may contain: outdoor
रांजणगाव गणपती,  ता. 17 जुलै 2018: पुणे-नगर महामार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनाने दोन दुचाकींना ठोकरल्याने तिघांना जीव गमवावा लागला असून, एक जण जखमी झाला आहे. रविवारी (ता. 15) रात्री उशिरा अपघात झाला.

पुणे- नगर रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलच्या समोर दोन दुचाकीला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टेंपोने धडक दिल्याने तिघेजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः रविवारी रात्री उशिरा शिरूरहून शिक्रापूरच्या दिशेने चाललेल्या दुचाकीस्वारांना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टेंपोने धडक देऊन चिरडल्याने तीन जण ठार तर एकजण जखमी झाला आहे. यामध्ये एकजण जागीच तर दोघांचा खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता मृत्यू झाला.

प्रवीण प्रभाकर जाधव (पाबळ), सुनील बबन शिंदे (केंदूर, थिटेवाडी) व गणेश अंकुश थिटे (थिटेवाडी, केंदूर) हे तिघेजण आपल्या दुचाकीवर( एम.एच 12,जे. टी. 9090) शिरूरहून शिक्रापूरकडे जात होते. त्यांच्या मागे विशाल राजाराम खांदवे (हवेली) हे दुचाकीवरून जात असतानाविरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या आयशर टेंम्पोने (क्रमांक एम.एच.12,एस.डी.3594) दुचाकींना जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या विचित्र अपघातात प्रवीण जाधव, सुनील शिंदे व विशाल खांदवे हे तिघेजण ठार झाले आहेत, तर गणेश थिटे हे जखमी झाले आहेत. टेंम्पो चालक फरार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या