तळेगाव ढमढेरे जि.प.शाळेची वृक्षदिंडी व अध्यात्मिक दिंडी

Image may contain: 5 people, people smiling, outdoorतळेगाव ढमढेरे,ता.१८ जुलै २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ व २ मधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी व अध्यात्मिक दिंडी काढली. यावेळी विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता.
 
विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, पर्यावरणाविषयी व निसर्गातील झाडांझुडपाविषयी जवळीक निर्माण व्हावी आणि वाचनाविषयी गोडी निर्माण होूवून पुस्तक वाचनातून मुलांच्या ज्ञानात वाढ व्हावी व तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड मिळावी या दृष्टीकोनातून या तिहेरी दिंडीचे आयोजन करण्यात आल्याचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर यांनी सांगितले.

या दिंडीच्या संयोजनात मुख्याध्यापिका मिनाक्षी गवळे, अशोक राऊत व अन्य शिक्षकांचा विशेष सहभाग होता. टाळ मृदगांच्या गजरात निघालेल्या दिंडीचे स्वागत अमरज्योत मंडळ, क्रांतीवीर मंडळ, हनुमान मंडळ, शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, घोडगंगाचे संचालक पोपट भुजबळ, माजी सरपंच विजय भुजबळ, माजी उपसरपंच बाळासाहेब ढमढेरे, मधुकर भुमकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे व ग्रामस्थांनी केले. मुख्याध्यापक कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या