इनामगावला आंदोलकांनी दुधानेच केली अंघोळ (Video)

इनामगाव,ता.१८ जुलै २०१८(प्रतिनीधी) : इनामगाव (ता.शिरुर) येथे आंदोलक शेतक-यांनी दुधानेच अंघोळ करत सरकारचा तीव्र निषेध केला.


राज्यशासनाच्या निषेधार्थ व दुधरदवाढीसाठी गेल्या दोन दिवसांपासुन राज्यभर आंदोलन केले जात आहे.शिरुर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासुन आंदोलनाची धग कायम असुन आंदोलनाच्या दुस-या दिवशी इनामगाव(ता.शिरुर) येथे आंदोलकांनी दुधानेच स्वत:ला अंघोळ घातली.तर शिरुर तालुक्याच्या अन्य भागात दुध ओतुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

वडगाव रासाई येथे दुध ओतुन न देता गोरगरीब व गरजुंना दुध वाटप करण्यात आले.शिरुर तालुक्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासुन आंदोलन तीव्र सुरु असुन दुध संकलन झालेले नाही. त्यामुळे शहराला होणारा दुधपुरवठा होउ शकला नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या