रांजणगावमध्ये सुरू होतोय पहिला सीएनजी गॅस पंप !

Image may contain: carरांजणगाव गणपती, ता.१८ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात रांजणगाव गणपती येथे सीएनजी गॅस स्टेशन सुरु करण्यात येणार असुन शिरुर तालु्कयाला याचा मोठा फायदा होणार आहे.

याबाबत रांजणगाव गणपती येथील तुषार काळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, पेट्रोल व डिझेल च्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.त्याचाच परिणाम सर्वसामान्यांना बसत असुन सर्वसामान्यांना वाहन परवडणे अशक्य झाले आहे.यावर पर्याय म्हणुन सर्वसामान्य सी.एन.जी गॅस कडे पाहत असतात.परंतु हि सुविधा फक्त शहरात उपलब्ध असते.शिरुर तालुक्यात ग्रामीण भागात सी.एन.जी उपलब्ध व्हावा अशी मागणी होती.याचाच विचार करत रांजणगाव गणपती येथील साई गणेश पेट्रोलपंपावर सी.एन.जी गॅस स्टेशन सुरु करण्यात येणार आहे.

या सुविधेमुळे पुणे नगर महामार्गाने प्रवास करणा-या तसेच शिरुर तालुक्यातील सर्वसामान्यांना सी.एन.जी गॅस उपलब्ध होणार असुन त्याचा मोठा फायदा  शिरुर तालुक्याला होणार आहे.लवकरच हि सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे काळे यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या