चिंचणीचे घोड धरण भरलयं केवळ १३ टक्के (Video)

Image may contain: sky, bridge, outdoor, water and natureचिंचणी,ता.१९ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्याला वरदान ठरत असलेल्या(चिंचणी,ता.शिरुर) येथील घोड धरणात बुधवार(दि.१८) रोजी १३.७२ टक्के पाणी साठा झाला असुन जुलै महिना उलगडत आला तरी धरणात केवळ तेरा टक्केच पाणीसाठा झाला असल्याने धरणक्षेञावर अवलंबुन असलेल्या शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शिरुर व श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरत असलेल्या चिंचणी(ता.शिरुर) येथील घोडधरणावर हजारो हेक्टर क्षेञ अवलंबुन असते.शिरुर तालुक्यात जुन व जुलै महिना अखेर मोठा पाउस झाला नाही.परंतु डिंभा,येडगाव,वडज धरणक्षेञात पाउस सुरु झाल्याने घोडनदीत विसर्ग सुरु केला आहे.बुधवार(दि.१८) रोजी घोडधरणात एकुण २९२२.०० दस लक्ष घनफुट इतका साठा झाला असुन ७५०.०० दस लक्ष घनफुट इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.घोडधरण बुधवार(दि.१८) रोजी अखेर १३ टक्के इतके भरले आहे.

दरवर्षी १५ अॉगस्ट पर्यंत धरण ९० टक्के इतके भरत असते व  त्यातुन घोडनदी पाञात पाण्याचा विसर्ग केला जातो.माञ जुलै महिना निम्मा उलटला तरी केवळ धरणात १३ टक्केच पाणी साठा झाल्याने शेतक-यांबरोबरच तालुक्यातील रांजणगाव येथे असणारी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला या धरणातुन पाणी जात आहे.त्यामुळे या पाणीसाठयाचा परिणाम औद्योगिक वसाहतीवर होउ शकतो.भविष्यात पाउस न झाल्यास या अल्प पाणीसाठ्याचा फटका शिरुर तालुक्यासह श्रीगोंदा तालुक्याला बसु शकतो.भिमानदी एकीकडे दुथडी भरुन वाहत असताना शिरुर तालुक्यातील घोड धरणाखालील बंधारे अद्यापही कोरडेच असल्याचे चिञ दिसत असुन घोड धरण लाभक्षेञाखालील असणा-या शेतक-यांकडुन चिंता  व्यक्त केली जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या