डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे वाचले रुग्णांचे प्राण

Image may contain: one or more peopleशिरुर,ता.१९ जुलै २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर येथील डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्यामुळे सर्पदंश झालेल्या रुग्णाचे प्राण वाचल्याची घटना नुकतीच घडली.

याबाबत सविस्तर असे कि, आंबळे येथील ज्ञानेश्वर बिरदवडे(वय.५७) यांना नुकताच अतिविषारी सापाने चावा घेतला होता.साप चावल्याचे लक्षात आल्यानंतर बिरदवडे यांच्या कुटुंबियांनी साप मारुन रुग्णासह तत्काळ शिरुर येथील श्रीगणेशा हॉस्पिटलला धाव घेतली.येथील डॉ.अखिलेश राजुरकर, विशाल महाजन यांनी तत्काळ रुग्णाला दाखल करुन घेतले.या वेळी रुग्णाची परिस्थिती बिघडत  असल्याचे लक्षात येताच सापाची जात लक्षात घेत योग्य औषधोपचार सुरु केले.व हळुहळु पेशंटमध्ये सुधारणा होउ लागली.

याबाबत डॉ.अखिलेश राजुरकर यांनी सांगितले कि, साप चावल्याचे लक्षात येताच व रुग्णाची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच सर्व डॉक्टरांनी रुग्ण वाचवायचे यासाठी मोठे प्रयत्न करत २५-३० औषधांच्या उपचारानंतर प्रकृती आटोक्यात आणण्यात यश आले.पावसाळ्याच्या दिवसात सर्वञ पाणीच पाणी होत असल्याने अडगळीच्या ठिकाणांतुन साप बाहेर येतात.सर्वच साप विषारी नसतात.मण्यार,घोणस, फुरसे,कोब्रा या सापांच्या विषारी जाती आपल्याकडे जास्त आढळुन येतात.हे विषारी साप चावल्यास घाबरुन न जाता रुग्णांनी घरगुती उपचार करु नयेत.तसेच दुर्लक्ष करु नयेत.दंश झालेल्या ठिकाणी घट्ट आवळुन बांधु नये.तत्काळ डॉक्टरांना दाखवावे अशा प्रकारची काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ.राजुरकर यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या