शिरुरच्या महिला 'त्या' प्रश्नांवर आक्रमक (Video)

शिरुर, ता.१९ जुलै २०१८(प्रतिनीधी) :  शिरुर बसस्थानकात महिलांची होणारी गैरसोय व इतर मागण्यांसाठी शिरुर शहरातील विविध महिला संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

या संबंधी महिला संघटनांनी शिरुरचे आगारप्रमुख यांना नुकतेच निवेदन दिले असुन त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि, शिरूर बस स्थानक हे राज्याचे प्रमुख व ऐतिहासिक बसस्थानक आहे. दररोज जवळपास दिड हजार बसेस या बसस्थानकावर थांबतात. यामधुन हजारो महीला प्रवास करत असतात. त्याचप्रमाणे शेकडो शाळकरी मुली ही येथुन प्रवास करत असतात. परंतु गेली पाच वर्षे झाली येथे महीलांना पुरेसे स्वच्छ व सुलभ शौचालय नाही. बसण्यासाठी जागा नाही. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. बसस्थानक परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून खडड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

बसस्थानकात काही महीला कर्मचारी आहेत. त्यांचेही स्वच्छतागृहे, निवासस्थान अस्वच्छ आहेत. बसस्थानक मॅनेजर व प्रशासनाचे याकडे पुर्ण दुर्लक्ष आहे. कॅन्टीन सुध्दा बंद आहे.तरी अर्ज प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा महीलांच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरु करण्याचा इशारा यशस्वीनीच्या सचिव नम्रता गवारी, मराठा महासंघाच्या अध्यक्षा वैशाली गायकवाड, मनसेच्या डॉ. वैशाली साखरे, जनाबाई मल्लाव, चंदना साळुंखे यांनी दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या