शिवसेनेच्या आंदोलनानंतर लसीकरणाचे आदेश (Video)

शिरुर, ता.२० जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिवसेना शेतकरी सेनेच्या आंदोलनानंतर शिरुर पंचायत समितीच्या वतीने जनावरांच्या लसीकरणाचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश विठ्ठल ओव्हाळ यांनी दिली.

शिरुर तालुका  शेतकरी सेनेने नुकतेच  शिरुर तालुक्यातील जनावरांची तपासणी व्हावी व लसीकरण करावी या मागणीसाठी शिरुर पंचायत समितीला आंदोलन करत मागण्यांचे निवेदन दिले होते.

या मागणींची दखल घेत शिरुर पंचायत समितीने शिरुर तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक अधिका-यांना परिपञकाद्वारे लसीकरणाच्या सुचना दिल्या आहेत.याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे.

शिवसेना शेतकरी सेनेचे योगेश विठ्ठल ओव्हाळ यांनी प्रशासनाचे आभार मानत आंदोलनाला यश आल्याचे बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या