मल्लिकार्जुन विद्यालयास ५० हजारांची पुस्तके प्रदान

Image may contain: 8 people, people smiling, people sitting, people standing and tableन्हावरे,ता.२३ जुलै २०१८(प्रतिनीधी) : न्हावरे(ता.शिरुर) येथील मल्लिकार्जुन विद्यालयास माजी विद्यार्थ्यांकडुन पन्नास हजार रुपये किमतींची पुस्तके  प्रदान करण्यात आली.

अभिनव उपक्रम वाचाल तर वाचाल,एक पूस्तक तूमचे आयुष्य बदलू शकते त्यासाठी पुस्तकी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचे अवांतर तसेच स्पर्धा परिक्षेचे वाचन झाले पाहिजे या  उद्देशातून ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे माजी विद्यार्थी संदीप कोकडे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जाणीवेतून काम करत असलेल्या हर हर महादेव संघटनेच्या वतीने विदयालयाला पन्नास हजार रूपयांची पुस्तके प्रदान केली. सदरील पूस्तके उपजिल्हाधिकारी कोकडे पवार यांनी प्राचार्य आण्णासाहेब धडस यांच्याकडे प्रदान केली.

याप्रसंगी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तहसीलदार परिक्षा उतीर्ण झालेले सागर ढवळे त्याचबरोबर वाहन निरीक्षक परिक्षा उतीर्ण झालेले अभिषेक कांडगे यांचा यावेळेस विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपजिल्हाधिकारी संदिप कोकडे ,सागर ढवळे व अभिषेक काडंगे यांनी यशाचे रहस्य उलगडले.

याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य दिपकशेठ कोकडे,पूढारीचे पत्रकार संजय गायकवाड,ग्रंथापाल प्रताप भोईटे उपस्थित होते.प्रास्ताविक क्रिडाशिक्षक कैलास खंडागळे सुत्रसंचलन सूहास धाईंजे यांनी केले तर आभार निलेश पवार यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या