पावसाची चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पाहतात वाट

Image may contain: grass, plant, sky, outdoor and nature
शिरूर, ता. 24 जुलै 2018 (तेजस फडके): शिरुर तालुक्यात पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास मुग व बाजरीची पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाची चातक पक्षाप्रमाणे शेतकरी वाट पाहत आहेत.

शिरुर तालुक्यातील विविध भागांमध्ये मुग, बाजरी, ज्वारी, कांदा हि पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा जास्त भर असतो. परंतु यंदा जुन महिन्याच्या सुरवातीपासुनच पावसाने शिरुर तालुक्यात पाठ फिरवली. एक दोन पावसाचा अपवाद वगळता शिरुर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सुरवातीला पेरलेल्या मुग व बाजरी या पिकांना याचा फटका बसला असून, येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास हि पिके हातची जाणार आहेत. त्यामुळे परत एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पाऊस नसल्याने ऊस उत्पादक शेतकरीही अडचणीत आले आहेत. उसाचे उत्पादन घटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पाऊस नसल्याने विहिरींना पाणी नसल्याने ऊस जळून जाण्यापेक्षा नाईलाजाने कमी भावात गुऱ्हाळाला विकायला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या