मराठा आरक्षणः पिंपरखेडला कडकडीत बंद पाळून निषेध

Image may contain: one or more people and outdoorपिंपरखेड,ता.२६ जुलै २०१८ (प्रतिनीधी) : पिंपरखेड (ता.शिरूर) येथे बुधवारी (दि.२५) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि सुरु असलेल्या आंदोलनात शहिद झालेल्या काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या राज्य सरकारच्या निषेधार्थ गावातील दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.

पिंपरखेड गावात हेमंत नरवडे, भाऊ सोनवणे, चिंतामणी कुऱ्हाडे, आप्पा वरे, सोपान गावशेते यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गावातील दवाखाना, मेडिकल, बँक वगळून सर्व व्यवसायिक, दुकानदार यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावातील सर्व दुकानदार, व्यवसायिक यांनी दुपारी चार वाजेपर्यंत व्यवहार बंद ठेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा समाजाबरोबरच इतर समाजातील व्यवसायिक दुकानदार यांनीही या बंद मध्ये सहभागी होऊन शंभर टक्के कडकडीत बंद पाळला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या