रांजणगावला जुगा-यांवर पोलीसांची धडक कारवाई

No automatic alt text available.रांजणगाव गणपती,ता.२६ जुलै २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथे पोलीसांनी धडक कारवाई करत जुगा-यांना अटक केली.

रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती गावामधील बस स्टॅंड जवळ खोलीमध्ये मटका चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, मिलिंद देवरे, संतोष घावटे या पथकाने छापा टाकत  कारवाई केली.

यावेळी कल्याण मटका चालविणारा गणेश विठ्ठल लोखंडे (रा.रांजणगाव गणपती), नरेंद्र गोपाल कामराथी, ईश्वर पांडुरंग फंड, विकास निवृत्ती गायकवाड यांना ताब्यात घेउन मटक्याचे साहित्य जप्त केले. रांजणगाव पोलीस स्टेशनला प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाली आहे. रांजणगाव परीसरात अशाच प्रकारच्या कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या