अपघातग्रस्तांना रांजणगावलाच मिळणार तत्काळ उपचार

Image may contain: outdoorरांजणगाव गणपती, ता.२७ जुलै २०१८(प्रतिनीधी) : पुणे-नगर महामार्गावर अपघात झाल्यानंतर रांजणगावलाच तत्काळ उपचार मिळणार असल्याने अपघातग्रस्तांची परवड थांबणार आहे.

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना मोठ्या प्रमाणावर इजा होत असतात. अनेकदा हाता-पायांसह अनेक गंभीर इजा झाल्यास पुण्यासारख्या दवाखान्यात उपचारांसाठी जावे लागायचे. रांजणगाव येथेच हाडांच्या उपचारांसाठी अत्याधुनिक रुग्णालय सुरु होत आहे.

याबाबत रांजणगाव येथील अथर्व हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध अस्थितज्ञ डॉ. संतोष रामा दुंडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, मोठ्या शहरांत चांगल्या सुविधा मिळत असतात.परंतु शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात हाडांच्या अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध होणे गरजेचे होते. त्याचबरोबर पुणे-नगर महामार्गावर सातत्याने अपघातांत वाढ होत आहे. त्या रुग्णांची उपचारांसाठी मोठी परवड होत होती. याचा सर्वंकश विचार करुन शिरुर तालुक्यातच उपचार मिळावे यासाठी रांजणगाव गणपती येथे अत्याधुनिक सर्व सोयीसुविधांसह अथर्व हॉस्पिटल रुग्णालय उभारले असुन लवकरच ते रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.त्याचा शिरुर तालुक्यातील रुग्णांना मोठा फायदा होणार असुन वेळ तर वाचणारच असुन शहरातील परवड थांबणार असल्याचे डॉ. संतोष रामा दुंडे यांनी सांगितले. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या