शिरुर पंचायत समितीच्या सभापतीपदी कोहोकडे (Video)

शिरुर,ता.२७ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर पंचायत समितीच्या सभापतीपदी विश्वास कोहोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शिरुर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप यांनी राजीनामा दिल्याने सभापती पद हे रिक्त होते.या जागी प्रभारी सभापती म्हणुन मोनिका हरगुडे या काही दिवसांपासुन काम पाहत होत्या.शुक्रवार(दि.२७) रोजी झालेल्या निवडणुक प्रक्रियेत दोन अर्ज आले होते.त्यातील विजय रणसिंग यांनी अर्ज माघारी घेतल्याने कोहोकडे यांची निवड करण्यात आली असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी भाउसाहेब गलांडे यांनी जाहिर केले.

या निवडीवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,माजी आमदार अशोक पवार,आंबेगाव बाजारसमितीचे सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे, जि.प.सदस्य राजेंद्र रणजित जगदाळे (पाटील), कुसुम मांढरे, सुनिता गावडे, स्वाती पाचुंदकर यांसह पंचायत समितीचे सदस्य, राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या