जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे: प्रा. संतोष परदेशी (Video)


वाघाळे, ता.२८ जुलै २०१८(प्रतिनीधी) : गुरुशिवाय काहीच साध्य होत नसुन जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रा. संतोष परदेशी यांनी केले.

गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून वाघाळे तालुका शिरूर येथील कालिका माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभ्यासक् संतोष परदेशी बोलत होते.

यावेळी परदेशी म्हणाले की शालेय जीवनात अनेक छंद जोपासा. ज्या छंदाची आवड आहे त्या छंदाचा विकास करा म्हणजे आपले करिअर घडेल. ज्या क्षे्त्रात तुम्ही  काम कराल त्या क्षेत्रात काम करताना आई, वडील, गुरु यांचा विसर पडू देऊ नका. जीवन खूप सुंदर आहे ते आनंदात जगा. खेळाची आवड निर्माण करा.मोबाईल वापर शालेय जीवनात टाळा.वाचनाची आवड निर्माण करा. जास्तीत जास्त शालेय जीवनात अभ्यासाचे कष्ट घ्या म्हणजे पुढील जीवन जास्त सुखाची जाईल.वडिलधार्‍या व्यक्तींचा आदर करा त्यांचे आशीर्वाद आपल्याला चांगल्या मार्गाकडे नेतील.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य नामदेव आगरकर होते. प्रास्ताविक संजय मचाले यांनी केले. या कार्यक्रमाला विकास सानप, बाळासाहेब शेळके, सतीश पाटील, धनाजी पवार, छाया जगदाळे, झरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मारुती सोमवंशी यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या