चातुर्मास प्रारंभानिमित्त शिरुरला विशेष कार्यक्रम

शिरूर,ता.२८ जुलै २०१८(प्रतिनीधी) : चातुर्मास प्रारंभानिमित्त येथील जैन पंचायत भवन मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपप्रवर्तीनी सुबोधीजी महाराज साहब यांनी ‘गुरुचे जीवनातील स्थान’या विषयांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की गुरु हे चंद्रा सारखे असतात, जे स्वंत:ही चमकतात आणि आपल्या शिष्यानाही चमकवतात. आपली आई ही आपल्या प्रथम गुरु आहे. दुसरा गुरु हे शिक्षक असतात. जे आपणांस अक्षरांची ओळख करून देतात आणि जीवनातील व्यवहारिक शिक्षण ही देतात. तिसरा गुरु हे अध्यात्मिक गुरु आहे. जे आपल्यातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश आपल्याला दाखवितात. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान फार मोठे आहे. ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याचे जीवन संघर्षमय असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी रिद्धीमाजी महाराज साहब यांनीही आपले विचार प्रगट केले. संघपती शांतीलाल कोठारी, भवरीलाल फुलफगर, गोरक्षण पांजरपोळचे अध्यक्ष रमणलाल बोरा, चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष मुन्ना चोरडिया,वर्धमान रुणवाल,निलेश खाबिया,आनंद फुलफगर,अनिल बोरा,राहुल बोथरा,लोकेश चोपडा,विकास सुराणा,मनोज बोरा,वैभव खाबिया,नितीन मुथा, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.चातुर्मास निमित्त शहरात सुबोधीजी महाराज, रीध्दिजी महाराज यांचे शहरात आगमन झाले आहे.

दरम्यान गुरुपोर्णिमेनिमित्त सोशलमिडीयातून पहाटे पासून शुभेच्छा संदेश पाठविण्यात येत होते.गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या शाळेतील शिक्षक व आपले गुरुस्थानी असणा-यांना गुलाबपुष्प देवून आशीर्वाद घेतले. याशिवाय शहरातील विविध शाळांमध्ये ही शिक्षकांना गुलाबपुष्प देण्यासाठी गर्दी आजी माजी विद्यार्थ्यांची झाली होती. परिसरातील मंदिरामध्येही गुरुपोर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुपोर्णिमेनिमित्त गुलाबपुष्पाला मोठी मागणी असल्याने गुलाबाचे भाव वधारले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या