तळेगाव ढमढेरेत कडकडीत बंद

Image may contain: 4 people, people walking, people standing, crowd and outdoorतळेगाव ढमढेरे,ता.२८ जुलै २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथे मराठा आरक्षणासाठी आज शुक्रवार (दि. २७) जुलै रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला.           

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे मराठा आरक्षणासाठी बंदचे आयोजन करण्यात आले होते. सर्व दुकाने, कार्यालये, व्यापारी गाळे बंद ठेवून कडकडीत आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ सकाळी बाजारपेठेतून व गावातून सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ व आंदोलनकर्त्यांनी पेठेतून व गावातून शांततेत मोर्चा काढला. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी व आंदोलनकर्त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात शिक्रापूरचे  पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार  यांना निवेदन दिले.

शुक्रवारी दिवसभर बाजारपेठेतील, एसटी स्टॅण्डवरील, बाजार तळावरील शिरूर बाजार समिती उपबाजार आवारातील तसेच तळेगाव ढमढेरे हद्दीतील सर्व दुकाने व गाळे कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. सर्व दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी बंदला उत्स्फुर्तपणे पाठिंबा दिल्याने सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते त्यामुळे तळेगाव ढमढेरे येथील पेठेतील रहदारीच्या व वर्दळीच्या रस्त्यावर देखील दिवसभर शुकशुकाट होता. एकंदरीत तळेगाव ढमढेरे येथे बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे चित्र होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या