रांजणगांव सांडस केंद्र शाळेत आर.ओ.फ़िल्टरचे उद्घाटन

Image may contain: 5 people, people standingरांजणगांव सांडस,ता.२८ जुलै २०१८(प्रतिनीधी) : रांजणगांव सांडस ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेस आर.ओ.फ़िल्टर देण्यात देण्यात आला.त्याचे उद्घाटन उपसरपंच राहुलदादा रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच शामकांत रणपिसे यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते मुलींना अस्मिता कॉर्ड वाटप करण्यात आले तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री.चव्हाण गुरूजी तसेच ईतर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.तसेच कार्यक्रमादरम्यान मराठा शहीद काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास उपसरपंच माजी सरपंच शामकांत रणपिसे,माजी सरपंच संजय काळभोर,पोलिस पाटील भानुदास रोकड़े,शाळा समिती अध्यक्ष महेंद्र रणदिवे,मा.तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद रणदिवे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष बाजीराव राक्षे, शिरूर तालुका भाजप औद्योगिक फेडरेशन सरचिटणीस सुधिर शितोळे, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटोळे, पंकज रणदिवे, महादेव रणदिवे, पोपट भंडलकर, शरद रणदिवे, शाळा समिति सदस्य संजय रणदिवे, उमेश रणदिवे, भानुदास शितोळे, अमोल राक्षे, स्वप्निल भोसले, सुनिल रणदिवे, सुनिल खाडे, सिद्धार्थ गायकवाड़ आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या