सादलगावमधील बेपत्ता व्यक्तीचा ७२ तासांनी लागला शोध

Image may contain: one or more people, people standing, outdoor, nature and waterImage may contain: 1 person, beard and closeupसादलगाव, ता.२८ जुलै २०१८ (संपत कारकुड) : सादलगाव-हातवळण बंधा-याच्या पाण्यात पडुन बेपत्ता झालेल्या व्यक्तीला अखेर ७२ तासानंतर शोधण्यात यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,मंगळवार (ता.२४) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सादलगाव (ता.शिरुर) येथील राजेंद्र दिवेकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन बंधाऱ्यावरून नदी पात्रात दुचाकीसह पडून वाहून गेले होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा परिसरात शोध चालू होता.अखेर शुक्रवार(ता.२७) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गणेगाव दुमाला गावाच्या हद्दीत त्यांचा मृतदेह शोधपथकाला आढळून आला.या शोध कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक, शिरूर पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमार यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर ७२ तासांनंतर नदीत वाहून गेलेला मृतदेह शोधण्यात यश आले.
          
यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, पोलीस उपनिरीक्षक युसुफ इनामदार, भगवान पालवे, आबासाहेब जगदाळे, श्रावण गुपचे, संतोष कदम,गणेश आगलावे, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमोद बलकवडे, संतोष शेलार, सागर जाबरे, प्रशांत कुंभार, निलेश कुसाळकर, अमित कोतवाल, शंकर वरपे, कैलास परदेशी, तुषार खाताळ, विनोद शिंदे, अक्षय काळे आदी उपस्थित होते. मृतदेहाची  उत्तरीय तपासणी न्हावरे येथे करण्यात आल्यानंतर रात्री उशीरा दिवेकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या