सादलगावला बारा एकर ऊस आगीत जळून खाक

Image may contain: 3 people, people standing, plant, outdoor and natureसादलगाव, ता.३० जुलै २०१८(प्रतिनीधी) : सादलगाव (ता.शिरूर) येथे अचानक लागलेल्या आगीत सुमारे १२ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली.

सविस्तर माहिती अशी की, सादलगाव (ता. शिरूर) येथे रविवारी (दि.२९) रोजी दुपारी तीनच्या सुमारास वडगाव रासाईलगत असलेल्या उसाच्या शेताला शॉर्टसर्किटने अचानक लागली. या वेळी आगीची तीव्रता मोठी असल्याने या लागलेल्या आगीत काही क्षणात अंकुश साहेबराव होळकर यांचा सहा एकर, अरुण श्रीपतराव होळकर यांचा अडीच एकर, राजेंद्र अरुण होळकर यांचा अडीच एकर, ताराबाई आबासाहेब होळकर यांचा एक एकर ऊस जळून खाक झाला. आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सादलगाव, मांडवगण फराटा परिसरात उसाचे क्षेञ मोठे आहे. उसाच्या शेताला आग लागल्याच्या घटना वारंवार घडत असून शेतकऱयांना दरवर्षी मोठय़ा नुकसानीस सामोरे जावे लागते. त्यामुळे या परिसरातील जीर्ण तारा बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या