दरोड्यातील फरारी आरोपीस 'एलसीबी'कडून अटक

Image may contain: one or more peopleशिरुर, ता.३० जुलै २०१८ (प्रतिनीधी) : संविदणे (ता.शिरुर) येथील दरोड्यातील व मोक्कयाच्या गुन्हयातील फरारी आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपीवर जिल्हयात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरु होता. तपासादरम्यान आरोपी रमेश नरसिंग भोसले हा शिरुर परिसरात असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय गिरमकर, नितीन गायकवाड, राजू मोमीन, पोपट गायकवाड, सचिन गायकलवाड, घारे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीवर भोसरी, शिरुर, शिक्रापुर, लोणी काळभोर अशा पोलीस ठाण्यात सुमारे १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या