पिक विमा ऑफलाइन अर्ज बँकेत जमा करण्याचे आवाहन

No automatic alt text available.
शिरूर, ता. 30 जुलै 2018 (तेजस फडके): पिक विमा भरण्यासाठी उद्या (31 जुलै) शेवटचा दिवस असून, शेतकऱयांनी ऑफलाइन अर्ज पीडीसीसी बँकेत दुपारी साडेचार वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

www.shirurtaluka.com ने 'पिक विमासाठी शेतकऱयांना धरले जाते वेठीस (Video)' या शिर्षकाखाली वृत्त प्रसारीत केले होते. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले होते.

संकेतस्थळाचे वृत्त मुख्यमंत्र्यांना ट्विट करण्यात आले होते. संकेतस्थळाच्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. शेतकऱयांनी जवळच्या पीडीसीसी बँकेच्या शाखेत उद्या (ता. 31) दुपारी साडेचार वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन बँकेच्या अधिकाऱयांनी केले आहे.

शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपन्यांना पाठवण्याच्या अंतिम तारखा
  • ग्रामिण बँका, व्यावसायिक बँका, खाजगी बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी 9 ऑगस्ट अंतिम तारीख आहे.
  • प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकडून जिल्हा सहकारी बँकांकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी अंतिम तारीख 9 ऑगस्ट आहे.
  • जिल्हा सहकारी बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी 23 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे.
  • 31 जुलैनंतर बँकांमार्फत विमा पोर्टलवर शेतकऱ्यांचा विमा तपशील भरता येणार आहे. ही सुविधा फक्त बँक आणि जिल्हा सहकारी बँकांसाठीच उपलब्ध असेल.
पोर्टलवर गावांची नावं मिळत नसतील तर काय?
दरम्यान, पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नसतील, पण राज्य शासनाने त्या गावांचे महसूल मंडळ अधिसूचित केलेली असतील तर अशा गावांतील शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकांनी स्वीकारावा आणि वर नमूद केलेल्या तारखांनुसार विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवावा, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकांनी विमा हप्ता 31 जुलै 2018 रोजीच त्यांच्या खात्यातून कपात करून घ्यावा. प्रस्ताव अपलोड करण्याचे काम 23 जुलै 2018 च्या शासन निर्णयातील तारखांप्रमाणे करता येईल. यासंबंधित सर्व सूचना कृषी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या