तळेगाव ढमढेरेत ग्राहक पंचायतचा अभ्यासवर्ग

Image may contain: 4 peopleतळेगाव ढमढेरे,ता.३१ जुलै २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथे ग्राहक पंचायतचा दोन दिवसीय निवासी राज्यस्तरीय अभ्यासवर्ग संपन्न झाला. या अभ्यासवर्गासाठी २७ जिल्ह्यातून  ग्राहक पंचायतचे ३५० कार्यकर्ते उपस्थित होते.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शनिवार(दि.२८ जुलै) व रविवार(दि.२९ जुलै) रोजी आयोजित ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या या अभ्यासवर्गात ग्राहक चळवळीतील कार्यकर्ता, ग्राहकांच्या समस्या व निराकरण, विजेचे वाढीव दर, लोक सेवा हमी कायदा, सायबर गुन्हेगारी, ग्राहकाभिमुख प्रशासन अधिकारी-मित्र उपक्रम, भारतीय मानक ब्यूरो, शेतकरी ग्राहक, लोकाभिमुख ग्राहक पंचायत, प्रवासी ग्राहक आदी विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन करून चर्चा केली.

ग्राहक सजग व्हावा त्याची फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन संपूर्ण तळेगाव ढमढेरे गावातून ग्राहक जागरण फेरी काढून जनजागृती केली. या कार्यक्रमात ग्राहक दिप या स्मरणिकेचे व  ग्राहक गीतांजली  या ध्वनिमुद्रित फीतिचे प्रकाशन करण्यात आले. स्वातंत्र्यसेनानी बिंदुमाधव जोशी यांच्या जीवनावर चित्रफितही  दाखविण्यात आली तसेच नाशिक विभाग आणि नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्याची कार्यकारणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली.

सिंधुदुर्गचे उपजिल्हाधिकारी विजय बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक मित्र या उपक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विजय लाड, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, उपसभापती विश्वास ढमढेरे,  पुणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्या शुभांगी दुनाखे, नाशिक विभाग अध्यक्ष बाबासाहेब जोशी, राज्य संघटक सर्जेराव जाधव, सहसंघटक मेधा कुलकर्णी, सचिव अरुण वाघमारे, पुणे जिल्हाध्यक्ष अशोक भोरडे, पुणे विभाग अध्यक्ष केदार नाईक, पुणे विभाग संघटक दिलावर तांबोळी, पुणे विभाग सचिव गुरुनाथ बहिरट, पुणे जिल्हा संघटक जनार्दन पांढरमिसे, शिरूर तालुका अध्यक्ष सतीश ढमढेरे, संघटक विवेकानंद फंड, मार्गदर्शक सेवा केंद्राचे अनिल जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या