...अन् शिरुरकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन (Video)

Image may contain: 10 people, people smiling, people standingशिरुर,ता.३१ जुलै २०१८(प्रतिनीधी) : शिरुर शहरात बससेवा बंद झाल्यानंतर बसस्थानकात अडकलेल्या प्रवाशांना मदत करत शिरुरकरांनी माणुसकिचे दर्शन घडविले.

चाकण येथे मराठा आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडल्याने शिरुर बसस्थानकातुन एस-टी बससेवा दुपारनंतर थांबविण्यात आली होती.लांब पल्ल्याच्या गाड्या सुरक्षेच्या कारणास्तव शिरुर बसस्थानकातच थांबविण्यात आल्या होत्या.त्यामुळे शिरुर बसस्थानकात राञी उशिरापर्यंत दोनशेच्या वर बसेस जमा झाल्या होत्या. दरम्यान दुपारनंतर बसेस बंद केल्याने ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजला येणा-या विद्यार्थ्यांनी गैरसोय होउ म्हणुन खासगी वाहतुकीचा आधार घेतला.सायंकाळनंतर बीड,उस्मानाबाद,तसेच लांबुन येणा-या प्रवाशांना शिरुरलाच थांबावे लागत असल्याने उशिरा जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता.

यावेळी शिरुर शहरातील युवकांनी बस्थानकात अडकलेल्या प्रवाशांना चहा,पाणी व नाष्ट्याची व्यवस्था केली. या झालेल्या मदतीने अनेकांनी भारावुन जात शिरुरकरांचे आभार मानले. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संतोष कदम यांच्यासह होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या