अंगारकी चतुर्थीनिमित्त रांजणगावला भाविकांची गर्दी (Video)


रांजणगाव गणपती, ता.१ अॉगस्ट २०१८ (तेजस फडके) : येथील महागणपती मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष डॉ. संतोष रामा दुंडे यांनी दिली.



पहाटे महागणपतीच्या मुर्तीस अभिषेक घालण्यात आला. या नंतर मंदिर भाविंकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. देवस्थानच्या वतीने दर्शनास आलेल्या भाविंकांना विविध सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. तर रांजणगाव पोलीस स्टेशन च्या वतीने परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात अाला होता.

भाविकांनी केलेल्या गर्दीने मंदिर परीसराला याञेचे स्वरुप आले होते. या वेळी दिवसभरात हजारो भाविकांसह राज्य महामार्ग पोलीस अधिक्षक अमोल तांबे, मनोज लोहिया, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी दर्शन घेतले असल्याचे डॉ. संतोष रामा दुंडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या